खडवणनाका परिसरातील घटनेने खळबळ; संजय रमेश कडू यांचा मृत्यू
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कोळंब येथील खडवणनाका परिसरात संजय रमेश कडू या तरुणाने बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय कडू यांची पत्नी मुलासोबत मोबाईलवर बोलण्यासाठी गेली असताना तीच संधी साधत राहत्या घरात गळफास घेतला. संजय कडू यांचा ब्लिचिंग पावडर पुरवठ्याचा व्यवसाय होता. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या निधनाने मित्रपरिवारासह परिचितांमधून दुःख व्यक्त होत आहे.
संजय कडू यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे कोळंब परिसरात शोककळा पसरली आहे.











