दोन विद्यार्थ्यांना ‘महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्कार’; प्रशालेलाही आदर्श प्रशालेचा सन्मान
मालवण (प्रतिनिधी) : महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेतर्फे आयोजित अखिल भारतीय राजभाषा हिंदी ओलंपियाड परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. प्रशालेतील मधुर अर्जुन पेंडुरकर आणि ऋतुजा सुहास परब यांना ‘महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या परीक्षेत प्रशालेतील एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशाबरोबरच वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा या प्रशालेला ‘आदर्श प्रशाला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी धनंजय गावडे यांना ‘आदर्श मुख्याध्यापिका’, तर श्री. बाळकृष्ण मल्लाप्पा वाजंत्री यांना ‘परीक्षा आयोजक’ म्हणून गौरविण्यात आले.
तसेच सौ. सिमरन समीर चांदरकर, श्री. भूषण विकास गावडे आणि श्री. रितेश तुकाराम जांभवडेकर यांना ‘आदर्श हिंदी अध्यापक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्वांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि मेडल प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री. महेश भाट, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.












