मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील गजानन महाराज बालगोपाळ मित्रमंडळातर्फे आयोजित नवरात्र गरबा उत्सवानिमित्त झालेल्या वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत लहान गटातून दीक्षा परुळेकर, तर मोठ्या गटातून धनश्री तोडणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत लहान आणि मोठ्या अशा दोन्ही गटांतील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेत विविध आकर्षक वेशभूषा साकारल्या. स्पर्धकांच्या कल्पक वेशभूषांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
लहान गट : प्रथम – दीक्षा परुळेकर, द्वितीय – रिद्धेश कामतेकर, तृतीय – शिवम म्हात्रे. उत्तेजनार्थ – सावी सोनवडेकर, सार्थक मालवणकर, काव्या मेस्त्री, अनुश्री मेस्त्री आणि विभास देऊलकर.
मोठा गट : प्रथम – धनश्री तोडणकर, द्वितीय – रेवा जोशी, तृतीय – नवेली मेस्त्री. उत्तेजनार्थ – सदा मयेकर, दिया लुडबे, नागेश कांदळगावकर, कुणाल माणगावकर, वैभव मालवणकर आणि अमन शेख.
विजेत्यांना गजानन महाराज भक्त मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देऊलकर, मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर आणि नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या वेळी गजानन महाराज बालगोपाळ मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.












