मालवण (प्रतिनिधी) : समाजकल्याण विभाग, सिंधुदुर्ग आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील समतादूतांनी पथनाट्याच्या माध्यमातून समाजकल्याण विभाग आणि बार्टीच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार केला.
या उपक्रमांतर्गत ओरोस बुद्रुक येथील सिद्धार्थनगर, कसाल बसस्थानक आणि ओरोस बसस्थानक येथे पथनाट्य सादर करण्यात आले. या माध्यमातून नागरिकांना सामाजिक न्याय विभाग आणि बार्टीच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
या वेळी बार्टीचे प्रभारी प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत सुदीप कांबळे, संग्राम कासले, सगुण जाधव, सुजित जाधव, राजू दिनदयाळ आणि सुहास मोचेमाडकर आदी उपस्थित होते.
समाजकल्याण विभाग, सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकने आणि बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
Under the Seva Sankalp campaign, Samatadoots from Sindhudurg used street plays at Oros Budruk, Kasal and Oros bus stations to spread awareness about Social Justice Department and BARTI welfare schemes.











