आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता सामंत यांचा पुढाकार; ग्रामस्थांकडून आभार
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कोळंब गावाच्या टेंबवाडीमध्ये खाऱ्या पाण्यामुळे निर्माण झालेला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून येथे बोअरवेल उभारून दिली. त्यामुळे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोळंब टेंबवाडी परिसरातील जलस्रोतांमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्याने पाणी पिण्यास अयोग्य बनले होते. त्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन गरजांसाठी पाण्याची समस्या भेडसावत होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता सामंत यांनी पुढाकार घेत बोअरवेलची उभारणी केली. या माध्यमातून ग्रामस्थांना पिण्यायोग्य गोडे पाणी उपलब्ध झाले आहे.
ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना युवा कार्यकर्ते शरद लोके यांनी आमदार नीलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, ग्रामपंचायत सदस्य विशाल फणसेकर, स्वप्निल परब, शिवसेना युवा कार्यकर्ते शरद लोके, चैतन्य लोके, सिद्धी लोके, सुशांत भोजने, राजू हडकर, प्रसाद डीचोलकर, रेहान भोजने, आदित्य आचरेकर, गणेश पेडणेकर, अजय लोके, प्रदीप भोजने, भटा फाटक, मंगेश लोके, महेश फाटक, सचिन नरे, नामदेव नरे, पुरुषोत्तम भोजने, सुधीर पेडणेकर, बाबू धुरी, रवींद्र जेठे, सुशांत लाड, प्रथमेश लाड, विजय भोजने, भास्कर कवटकर, राणी आचरेकर, सरिता हडकर, नंदा हडकर, मंदा हडकर, दीपा फाटक, सुमन भोजने, संगीता भोजने, निकिता भोजने, उर्मिला भोजने, शिवम भोजने, शिवम फणसेकर, तन्मय नरे, मिताली फाटक, सीमा फाटक, उत्तम हडकर, रेखा पेडणेकर, सुचिता पेडणेकर आणि भाई ढोलम यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.











