कुमुद गजानन रेगे यांच्या साहित्यकृतीवर रसग्रहणात्मक विवेचनाची संधी; २३ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी
मालवण (प्रतिनिधी) : वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नगर वाचन मंदिर, मालवण यांच्यातर्फे गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुकास्तरीय खुल्या वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध साहित्यिक कुमुद गजानन रेगे यांची कोणतीही एक साहित्यकृती हा विषय निश्चित करण्यात आला आहे.
वय वर्षे १६ व त्यावरील सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धकांनी निवडलेल्या साहित्यकृतीचे रसग्रहणात्मक विवेचन वक्तृत्वाच्या माध्यमातून सादर करणे अपेक्षित आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना ६ डिसेंबर २०२६ रोजी जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत संजय शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण यांच्याकडे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी ९४२२२३४९५० किंवा ८३९०६९४३३१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
तालुक्यातील जास्तीत जास्त वाचनप्रेमी आणि साहित्यरसिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन नगर वाचन मंदिराचे उदयराव मोरे यांनी केले आहे.












