सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाकडील अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले पात्र उमेदवार शैलेश संतोष नेवाळकर यांना कणकवली नगरपंचायतीमध्ये लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, नगरविकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त विनायक औंधकर, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा नियुक्तीबाबतच्या सर्वसमावेशक सुधारित धोरणानुसार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या माध्यमातून शैलेश नेवाळकर यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून त्यांना लिपिक पदावर नियुक्ती दिली आहे.











