जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; महाविद्यालयाकडून अभिनंदन
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुकास्तरीय १९ वर्षांखालील कॅरम स्पर्धेत भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी कला शाखेची विद्यार्थिनी अक्षया मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अक्षया हिने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कौशल्याची छाप उमटवली. तिच्या या यशामुळे भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अक्षया मांजरेकर हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी. बनसोडे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.











