सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्पर्धा; चित्रकलेत चिंदरच्या देवश्री तवटे, मालवणच्या नेहाली खवणेकर प्रथम
सिंधुदुर्ग (जिमाका) : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयामार्फत आयोजित सेवासंकल्प अभियानांतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, चित्रकला स्पर्धेच्या पाचही गटांतील प्रथम तीन क्रमांकांचे विजेते घोषित करण्यात आले आहेत. वक्तृत्व स्पर्धेतील गट क्रमांक १ आणि २ मधील विजेत्यांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
चित्रकला स्पर्धेतील विजेते
चित्रकला स्पर्धेच्या गट क्रमांक १ मध्ये मालवण तालुक्यातील चिंदर येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेची देवश्री सचिन तवटे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. सावंतवाडी तालुक्यातील डोंगरपाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मैत्री निवृत्ती गवस हिने द्वितीय, तर सावंतवाडी नं. २ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मेघा मकरंद देसाई हिने तृतीय क्रमांक मिळविला.
गट क्रमांक २ मध्ये सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली नं. ८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची आराध्या अभय कोठावळे हिने प्रथम क्रमांक मिळविला. वैभववाडी तालुक्यातील मौदे येथील बालभवन विद्यामंदिरची सिया संतोष मोहिते हिने द्वितीय, तर कणकवली तालुक्यातील वाघेरी नं. १ जिल्हा परिषद शाळेचा विघ्नेश अंकुश गुरव याने तृतीय क्रमांक पटकाविला.
गट क्रमांक ३ मध्ये कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील न्यू शिवाजी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलचा सर्वेश दिनेश मेस्त्री याने प्रथम क्रमांक मिळविला. वैभववाडी तालुक्यातील आखवणे नं. १ विद्यामंदिरची श्रावणी संतोष पांचाळ हिने द्वितीय, तर देवगड तालुक्यातील मुणगे येथील भगवती हायस्कूलची भूमी योगेश आईर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
गट क्रमांक ४ मध्ये वैभववाडी येथील अ. रा. विद्यालयाची दुर्वांक्षी दीपक फाटक हिने प्रथम क्रमांक पटकाविला. सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलची निष्का संदीप नार्वेकर हिने द्वितीय, तर देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूलची खुशी संतोष चौकेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
गट क्रमांक ५ मध्ये मालवण येथील स. का. पाटील हायस्कूलची नेहाली विठोबा खवणेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची रुचिता चंद्रशेखर वराडकर हिने द्वितीय, तर कणकवली तालुक्यातील कळसुली इंग्लिश स्कूलची मनाली अरुण घाडीगावकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते
वक्तृत्व स्पर्धेच्या गट क्रमांक १ मध्ये कुडाळ तालुक्यातील भडगाव मलाड जिल्हा परिषद शाळेची हंसिका बावदाणे हिने प्रथम क्रमांक मिळविला. मालवण तालुक्यातील कोळंब कातवड जिल्हा परिषद शाळेची श्रेजा अंकुश कणेरकर हिने द्वितीय, तर वैभववाडी तालुक्यातील वाभवे नं. १ विद्यामंदिरची संस्कृती सिद्धेश साटम हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
गट क्रमांक २ मध्ये वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे नारकरवाडी विद्यामंदिरची स्वामिनी संजय पाटील हिने प्रथम क्रमांक मिळविला. सावंतवाडी नं. २ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दक्ष वालावलकर याने द्वितीय, तर दोडामार्ग नं. १ जिल्हा परिषद शाळेची स्पृहा सुमित दळवी हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
सेवासंकल्प अभियानांतर्गत आयोजित या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि वक्तृत्व कौशल्याला व्यासपीठ मिळाले. जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.












