मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश; संस्था व प्रशालेकडून अभिनंदनाचा वर्षाव
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी गौरांग गणेश वाईरकर याची कबड्डी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी २०२६ साठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गौरांग याने मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याला प्रशालेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. त्याच्या या निवडीबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक व विश्वस्त यांनी अभिनंदन केले.
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट, मार्गदर्शक शिक्षक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गौरांगचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गौरांगच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे हे फलित असून त्याच्या राज्यस्तरीय निवडीचा संस्थेला आणि प्रशालेला अभिमान असल्याची भावना संस्था पदाधिकारी व शिक्षकांनी व्यक्त केली.












