‘एकच साहेब, एकच बाळासाहेब’च्या घोषणांनी शिवसैनिकांनी जागवल्या आठवणी
मालवण (प्रतिनिधी) : ‘अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब ठाकरे अमर रहे… एकच साहेब, एकच बाळासाहेब’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शाखेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले.
ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उमेश मांजरेकर आणि नंदू गवंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
या प्रसंगी शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक तथा नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, उपशहरप्रमुख किरण चव्हाण, शाखाप्रमुख किशोर गावकर, बंड्या सरमळकर, पॉली गिरकर, गणेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, विशाल सरमळकर, सुरेश माडये आणि बबन वाघ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.












