मालवण (प्रतिनिधी) : भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चातुर्मास कीर्तनमाला २०२६’ अंतर्गत मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री दत्त मंदिर, भरड-मालवण येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कीर्तनमालेतील यंदाचे हे सहावे पुष्प असून ‘संत नामदेव सद्गुरू भेट’ हा विषय कीर्तनकार वीणा परब (मालवण) आपल्या कीर्तनातून उलगडणार आहेत. संत नामदेव यांच्या भक्तीपरंपरेतील महत्त्वपूर्ण प्रसंग आणि सद्गुरू भेटीचा आध्यात्मिक आशय कीर्तनातून रसिकांसमोर मांडला जाणार आहे.
या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाविक आणि रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवाजी वाचन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.











