मालवण (प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, आचरा सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता देवूळवाडी मित्र मंडळ पुरस्कृत जिल्हास्तरीय भव्य खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला १० हजार १ रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या संघाला ७ हजार १ रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या संघाला ५ हजार १ रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ संघांना प्रत्येकी १ हजार २०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या सात संघांनाच प्राधान्य देण्यात येणार असून प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी जास्तीत जास्त २० मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक संघांनी वेळेत नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी अर्जुन बापर्डेकर – ९४२००८२३२० आणि नितीन घाडी – ९३०७७१४४४१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.












