मालवण (प्रतिनिधी) : नगर वाचन मंदिर, मालवणच्या वतीने जिल्हास्तरीय ‘कवी शरद साटम स्मृती काव्य स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता नगर वाचन मंदिराच्या सभागृहात होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ७००, ५०० आणि ३०० रुपये, तसेच प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी कविता स्वरचित आणि मराठी भाषेतील असणे आवश्यक आहे. सामाजिक आणि प्रेमविषयक कवितांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कवितेमध्ये राजकीय विडंबन किंवा अश्लील मजकूर नसावा, तसेच कविता दीर्घ नसावी, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक स्पर्धकाला कविता सादरीकरणासाठी ३ ते ५ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. एका स्पर्धकाला केवळ एकाच कवितेचे सादरीकरण करता येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी आपल्या कविता १० ऑक्टोबरपर्यंत नगर वाचन मंदिराकडे पोहोचतील अशा पद्धतीने पाठवाव्यात किंवा समक्ष आणून द्याव्यात. कविता पाठविण्याचा पत्ता : संजय शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, जि. सिंधुदुर्ग. स्पर्धकांनी कवितेसोबत आपला संपर्क क्रमांक देणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी सहायक ग्रंथपाल श्रेया चव्हाण यांच्याशी ८३९०६९४३३१ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर स्पर्धेबाबत इतर माहितीसाठी संजय शिंदे, ग्रंथपाल यांच्याशी ९४२२२३४९५० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
जिल्ह्यातील कवी आणि काव्यप्रेमींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगर वाचन मंदिरचे उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी केले आहे.











