एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर; विविध श्रेणींतील आदर्श रक्तदात्यांचा गौरव
मालवण (प्रतिनिधी) : रक्तदानातून जीवनदानाचा संदेश देत मालवणात राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एकता मित्रमंडळ, मालवण आणि ग्लोबल रक्तदाते, मालवण-सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, सेवा संकल्प अभियान व ग्रामीण रुग्णालय, मालवण यांच्या सहकार्याने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी रक्तदानाची शपथ देण्यासोबतच विविध श्रेणींतील आदर्श रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरपालिका बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेवक मंदार ओरोसकर, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, उत्तम पेडणेकर, उमेश सांगोडकर, ॲड. ऋषी देसाई, डॉ. जुई देसाई, जयश्री हडकर, महेश अंधारी, राजा शंकरदास, दादा वेगुर्लेकर, मनोज गिरकर, गुरुनाथ नाईक, बाळा गरगटे, राजू बिडये, अमेय देसाई, मुकेश बावकर, अंकुश कातवणकर, संदीप पेडणेकर, संदीप पाटील, राधा केरकर, वृषाली धुरी आणि विजय पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, डॉ. प्रशांत बागडे, संतोषी देसाई, राहुल साखरे, सोनू हटवाल तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवर, रक्तदाते आणि कार्यकर्त्यांना रक्तदानाची शपथ देण्यात आली.
स्व. नेहा कोळंबकर शंकरदास यांच्या स्मरणार्थ सेवाकार्य
स्व. नेहा कोळंबकर शंकरदास यांच्या स्मरणार्थ गरजू रुग्णांना अल्पदरात वैद्यकीय उपयोगाचे साहित्य उपलब्ध करून देण्याची योजना ग्लोबल रक्तदाते संस्थेने गेल्या वर्षी सुरू केली होती. या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून, याद्वारे अनेक गरजू रुग्णांना मदत मिळाली आहे. भविष्यातही हे सेवाकार्य अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार ग्लोबल रक्तदाते यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
आदर्श रक्तदात्यांचा गौरव
रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था, कुटुंबे आणि व्यक्तींचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
- आदर्श रक्तदाता संस्था पुरस्कार : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस, वेंगुर्ला आणि श्री कृष्ण मंदिर, धुरीवाडा, मालवण.
- आदर्श ग्लोबल रक्तकर्ण पुरस्कार : महेश श्रीधर राऊळ (तुळस, वेंगुर्ला).
- आदर्श रक्तदाता कपल पुरस्कार : अविनाश खानोलकर आणि आकांक्षा अविनाश खानोलकर.
- आदर्श रक्तदाता कुटुंब पुरस्कार : विद्याधर मेस्त्री, ललित मेस्त्री, तुषार मेस्त्री, सागर मेस्त्री आणि वैभव मेस्त्री (सोमवार पेठ, मालवण).
- आदर्श ग्लोबल रक्तदाता मालवण-सिंधुदुर्ग पुरस्कार : रामचंद्र मधुकर तळाशिलकर, नितेश प्रदीप मांजरेकर, पद्माकर बाळकृष्ण माणगांवकर, निलेश अनिल पराडकर आणि पिटर कैतान फर्नांडीस.
- आदर्श ग्लोबल रक्तविरांगना मालवण पुरस्कार : अंजली विराज आचरेकर.
रक्तसंकलनासाठी वैद्यकीय पथकाचे सहकार्य
शिबिरात ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने डॉ. भारती ठोंबरे, डॉ. शिवम देशमाने, सुमगल बुगडे, भूषण मळेकर, जोसेफ पिंटो, भक्ती शिरसाठ, कांचन परब, नितेश पाटील, गणपत गाडगे, खुमाजी बिले आणि नितीन गावकर यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी तुषार मेस्त्री, ॲड. रोहित गरगटे, संतोष माणगावकर, अंकित कोवळे, केदार देसाई, चिन्मय गिरकर, कल्पेश पेडणेकर, रोहन गिरकर, रुपेश तायशेटे, ललित मेस्त्री, विद्या मेस्त्री, हितेंद्र हिरलोस्कर, अमित नाईक, अभिजीत खानोलकर, भूषण गरगटे, रवी गरगटे, राधिका मोंडकर, अनुष्का चव्हाण, मनाली दळवी, वैशाली शंकरदास, नंदिनी गावकर, दीक्षा गावकर, मीना घुर्ये, मिताली मोंडकर, किरण कारेकर, गणेश प्रभुलकर, उमेश शिरोडकर, रतन देसाई, आशा देसाई, ऋतुजा देसाई, वेदिका गरगटे आणि निलेश गवंडी यांनी विशेष सहकार्य केले.
रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे प्रभावी माध्यम आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.










