The Sindhudurg Social Welfare Department and BARTI organized a snack distribution programme for senior citizens at Anandashray Old Age Home in Anav under the Seva Sankalp Abhiyan.
मालवण (प्रतिनिधी) : समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना खाऊचे वाटप करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समतादूतांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांप्रती आपुलकी व्यक्त करणे आणि त्यांच्याशी संवाद साधत सामाजिक बांधिलकी जपणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या वेळी बार्टीचे प्रभारी प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत सुदीप कांबळे, संग्राम कासले, सगुण जाधव, सुजित जाधव, राजू दिनदयाळ आणि सुहास मोचेमाडकर आदी उपस्थित होते.
समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकने आणि बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.











