नूतन कार्यकारिणीची निवड; संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बैठक
मालवण (प्रतिनिधी) : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या चौके गाव शाखेच्या अध्यक्षपदी नामदेव कृष्णा चौकेकर यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या पुनर्बांधणीच्या उद्देशाने आयोजित विशेष बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. ज्येष्ठ मार्गदर्शक पी. के. चौकेकर आणि दुलाजी चौकेकर यांच्या उपस्थितीत तसेच मार्गदर्शनाखाली संघटनेची पुनर्बांधणी करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी संजय दुलाजी चौकेकर, महिला उपाध्यक्षपदी अनिता अनंत चौकेकर, सचिवपदी कुणाल दादु चौकेकर, सहसचिवपदी रुपेश शिवराम जाधव, कोषाध्यक्षपदी समीर रविंद्र चौकेकर, तर सहकोषाध्यक्षपदी सचिन चौकेकर यांची निवड करण्यात आली.
तसेच मुख्य संघटक म्हणून अनंत बाबाजी चौकेकर, संघटक म्हणून महेश शिवराम जाधव आणि गजानन काशिराम कदम, तर महिला संघटक म्हणून दिपाली दिलीप कांबळी यांची निवड करण्यात आली.
यावेळी पी. के. चौकेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ॲड. अशोक चौकेकर, बाबाजी चौकेकर आणि नागेश चौकेकर यांनी नूतन कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून चौके गावात संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.












