मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यव्यावसायिकांना विविध योजनांचा लाभ घेण्याची संधी; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने MahaDBT 2.0 हे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सा. वि. कुवेसकर यांनी केले आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या ऑनलाइन पोर्टलचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर ही योजना राज्यात कार्यान्वित झाली आहे. या माध्यमातून मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी संबंधित विविध घटकांना योजनांचा लाभ घेता येणार आहे.
इच्छुक लाभार्थ्यांना MahaDBT 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार तसेच मत्स्यव्यवसायाशी निगडित इतर घटकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
– सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग
साईछाया, सेवांगण रोड, धुरीवाडा, ता. मालवण
प्रतिक महाडवाला : ०२३६५-२५२००७
– सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, वेंगुर्ला
रामेश्वर मंदिराजवळ, वेंगुर्ला मार्केट
गणेश टेमकर : ९४०८२८५४७३
– सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, देवगड
दुसरा मजला, हॉटेल डायमंड, सातपायरी, देवगड
किरण वाघमारे : ९८८१६००९५१










