दहीकाला आणि पालखी मिरवणुकीचे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील नांदरुख येथील ग्रामदैवत श्री देव गिरोबा मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दहीकाला आणि पालखी मिरवणूक हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
ग्रामदैवताच्या दर्शनासाठी आणि नवसफेडीसाठी परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या धार्मिक सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी होऊन श्री देव गिरोबाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











