मालवण (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मालवण येथील आमदार निलेश राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.
या प्रसंगी मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, नगरसेवक महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका मेघा सावंत, अभय कदम, शिवाजी केळूसकर आदी उपस्थित होते.











