मालवण : ज्ञान, वाचन आणि स्मरणशक्तीला चालना देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनाच्या साहित्य संपदा प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहा स्पर्धकांनी प्रत्येकी १०० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून विविध गुणांच्या गटांमध्ये अनेक स्पर्धकांनी यश मिळविले आहे.
विवा विराज तळाशिलकर, पांडुरंग कृष्णा राणे, चित्रा निलेश हिरे, रेश्मा सुषण ढवण, ऋतुजा मुळे आणि मोहिनी हडकर यांनी प्रत्येकी १०० गुण मिळवले. स्वरा पाटकर, सुषमा युगलकिशोर प्रभूगांवकर आणि नेहा सामंत यांनी प्रत्येकी ९८ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.
महादेव श्रीहरी घोडके, गौरवी पराडकर आणि गौरी अभिजीत केणी यांनी प्रत्येकी ९६ गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. साक्षी मेस्त्री आणि राधा घोगरे यांनी प्रत्येकी ९४ गुण मिळवत उत्तेजनार्थ प्रथम, तर सायली परब, जान्हवी चव्हाण आणि प्राची सचिन राजाध्यक्ष यांनी प्रत्येकी ९२ गुण मिळवत उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत ४७ स्पर्धक सहभागी झाले होते. नेहा हुनारी आणि गौरी केळुसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यशस्वी स्पर्धकांना ग्रंथभेट आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.











